UPSC परीक्षेचे फॉर्म सुटले! जनरलपासून SC-ST पर्यंत, कोणाला किती वेळा देता येणार परीक्षा?

Rashmi Mane

UPSC परीक्षा

UPSC नागरी सेवा परीक्षा म्हणजे लाखो तरुणांचं स्वप्न. IAS, IPS, IFS बनण्यासाठी कठोर मेहनत लागतेच, पण त्यासोबत नियमांची अचूक माहिती असणंही तितकंच महत्त्वाचं आहे.

परीक्षा किती वेळा देऊ शकतो?

UPSC चा फॉर्म सुटल्यावर अनेक प्रश्न मनात येतात. सर्वात मोठा प्रश्न असतो. ही परीक्षा आपण किती वेळा देऊ शकतो? जनरल, OBC, SC-ST उमेदवारांसाठी प्रयत्नांची संख्या वेगळी असते.

पात्रता

सिव्हिल सर्व्हिसेस परीक्षेसाठी अर्ज करणारा उमेदवार भारताचा नागरिक असणं आवश्यक आहे. तसेच कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवी (Graduation) पूर्ण केलेली असावी.

UPSC | Sarkarnama

वयोमर्यादा

वयोमर्यादेबद्दल बोलायचं झालं, तर जनरल कॅटेगरीसाठी कमाल वय 32 वर्षे आहे. OBC उमेदवारांना 35 वर्षे, तर SC-ST उमेदवारांना 37 वर्षांपर्यंत परीक्षा देता येते.

UPSC Aspirant Must Read this book | Sarkarnama

किती वेळी करता येतो प्रयत्न?

प्रयत्नांच्या संख्येतही फरक आहे. जनरल कॅटेगरी उमेदवारांना 6 वेळा, OBC उमेदवारांना 9 वेळा, तर SC-ST उमेदवारांना वयोमर्यादेपर्यंत प्रयत्न करता येतात.

UPSC History | Sarkarnama

नियमांमध्ये नवे बदल

UPSC च्या नियमांमध्ये आता महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार आधीच IAS किंवा IFS म्हणून निवड झालेले उमेदवार पुन्हा परीक्षा देऊ शकत नाहीत.

UPSC Exam | Sarkarnama

काय आहे नवीन नियम ?

जर निवड झालेला अधिकारी पुन्हा UPSC परीक्षा द्यायची असेल, तर त्याला आधी आपल्या सध्याच्या पदाचा राजीनामा द्यावा लागेल. त्याशिवाय दुसरी संधी मिळणार नाही.

UPSC exam | sarkarnama

रणनीती ठरवणं गरजेचं

या नव्या नियमांचा उद्देश अधिकाधिक नव्या उमेदवारांना संधी देणे हा आहे. त्यामुळे तयारी करणाऱ्या तरुणांनी नियम नीट समजून घेऊनच आपली रणनीती ठरवणं गरजेचं आहे.

UPSC 2025 results | Sarkarnama

Next : किती शिकले आहेत पुण्याचे नगरसेवक? 45 दहावीपर्यंत, 61पदवीधर

येथे क्लिक करा