Baba Ram Rahim : डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा राम रहीम पुन्हा एकदा चर्चेत!

Mayur Ratnaparkhe

हरियाणातील डेरा सच्चा सौदा प्रमुख बाबा गुरमीत राम रहीमला पंजाब-हरियाणा हायकोर्टाकडून मोठा दिलासा मिळाला आहे.

बाबा गुरमीत राम रहीमला हरियाणामधील बहुचर्चित रणजीत सिंह हत्या प्रकरणातून मुक्त केले आहे.

हायकोर्टाने सीबीआय कोर्टाचा निर्णय रद्द करत राम रहीमची हत्या प्रकरणात निर्दोष मुक्तता केली.

या हत्याकांडातून न्यायालयाने राम रहीमसह पाच आरोपींची निर्दोष मुक्तता केली.

बाबा राम रहीमला 2017मध्ये 20 वर्षांची शिक्षा सुनावली गेली आहे.

राम रहीम हा कायमच वादाच्या भोवऱ्यात आढळलेला आहे.

दोन महिला अनुयायांवर बलात्कार केल्याप्रकरणी त्याला ही शिक्षा सुनावली गेली आहे.

सध्या तो रोहतक येथील तुरुंगात शिक्षा भोगत आहे.

NEXT : 534 वर्षांचं झालं अहमदनगर, जाणून घ्या इतिहास