सरकारनामा ब्यूरो
आयएएस अधिकारी हे जिल्हा आणि मंत्रालय स्तरासह भारत सरकारमधील सर्व विभागांचे प्रमुख असतात.
IAS हे भारताच्या प्रशासकीय सेवेतील सर्वात प्रतिष्ठीत पद आहे. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या परिक्षार्थींना आयएएस पदाचे आकर्षण असते.
प्रशासकीय सेवेतून निवडून गेलेल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती भारत सरकारचे सचिव म्हणून ही केली जाते.
IAS पदांमध्ये विशेष एजन्सीचे संचालक, राज्य सरकारचे मुख्य सचिव, राज्य विभागांचे सचिव, भारतीय रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर, निवडणूक आयुक्त आणि इतरही काही विशिष्ट पदांचा समावेश होतो.
सरकारी धोरणे आणि निवडी या प्रभावी आहेत का? याची खात्री करण्यासाठी हे अधिकारी काम करु शकतात.
आयएएस अधिकाऱ्यांचे कार्यभार हा राज्यांच्या निकषानुसार बदलू शकते.
IAS हे पद प्रशिक्षण कालावधीत दिले जाणारे प्रशासकीय अधिकाऱ्यांसाठी मुख्य पद आहे.
कॅबिनेट सेक्रेटरी हे आयएएस अधिकाऱ्यांचे सर्वोच्च पद आहे. भारताच्या पंतप्रधान कार्यालयाच्या अंतर्गत येणारे हे पद आहे.