सरकारनामा ब्यूरो
1996 च्या बॅचचे IPS नवनीत सिकेरा यांनी हिंदी माध्यमातून शालेय शिक्षण पूर्ण केले.
उच्च शिक्षणासाठी दिल्लीच्या हंसराज कॉलेजमध्ये आल्यानंतर इंग्रजी कच्ची असल्याने त्यांची खिल्ली उडवली गेली.
त्यानंतर त्यांनी आयआयटी दिल्लीत प्रवेश घेतला आणि तेथूनच पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले.
आई-वडील गावात असताना काही लोकांनी त्यांची जमीन बळकावली. त्यावेळी पोलिस ठाण्यात गेले असता, तेथील कर्मचाऱ्यांनी त्यांच्याशी गैरवर्तन केले. त्यानंतर त्यांनी पोलिस अधिकारी होण्याची निर्णय घेतला.
सिकेरा यांना एम-टेक करायचे होते. मात्र, या घटनेनंतर त्यांनी नागरी सेवेची तयारी करून चांगल्या रँकने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली.
सिकेरा हे आयएएस होऊ शकले असते. मात्र, गुन्हेगारी मिटवण्यासाठी त्यांनी आयपीएसची निवड केली.
गुन्हेगारी आणि गुन्हेगारांनी भरलेल्या उत्तर प्रदेशातील ही परिस्थिती त्यांच्यामुळे बदलू लागली.
सिकेरा हे गुन्हेगारांच्या मनात भीती अन् जनतेसाठी सदैव तत्पर राहणारे अधिकारी आहेत.
मनोरंजन क्षेत्रातही प्रसिद्ध असलेल्या सिकेरा यांच्यावर आधारित भवकाल नावाची वेब सीरिज प्रदर्शित झाली आहे.
R