दरोडेखोराचा नातू ते IAS अधिकारी'; आता शास्त्रज्ञही झाला

Aslam Shanedivan

IAS देव तोमर

IAS देव तोमर आज सरकार दरबारी अधिकारी झाले असले तरीही त्यांना त्यांचे आजोबा एक दरोडेखोर असल्याने अनेक संकटाचां सामना करावा लागला

IAS Dev Tomar | sarkarnama

दरोडेखोराचा नातू

तर ते दरोडेखोराचा नातू असल्याने काहीही करू शकणार नाहीत असा टोमना लोक मारत असत. पण कठोर परिश्रम आणि समर्पणाने ग्वाल्हेरचे देव तोमर IAS झाले

IAS Dev Tomar | sarkarnama

वार्षीक 88 लाखांचे पॅकेज

यूपीएससी उत्तीर्ण होण्यापूर्वी देव नेदरलँड्समधील फिलिप्स कंपनीत शास्त्रज्ञ म्हणून काम करत होते. त्यांना वार्षीक 88 लाखांचे पॅकेज होते

IAS Dev Tomar | sarkarnama

यूपीएससी क्रॅक

पण गडगंज पगाराची नोकरी सोडून त्यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचे ठरवले आणि त्यांनी 629 वा क्रमांक मिळवला

IAS Dev Tomar | sarkarnama

यूपीएससीच्या प्रवासात सहा अपयश

देव यांनी याच्याआधी यूपीएससीच्या प्रवासात सहा अपयश पचवले आहेत. तर चार वेळी मुख्य परिक्षा ते पास झाले होते. तर तीन वेळी सलग मुलाखतीपर्यंत धडक मारली होती

IAS Dev Tomar | sarkarnama

आजोबा होते दरोडेखोर

देवचे आजोबा राम गोविंद सिंग तोमर, एकेकाळी चंबळच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये दरोडेखोर होते. पण, देवचे वडील बलवीर सिंग तोमर यांनी देवला आयआयटीतून पदवीधर केले. ते संस्कृतमध्ये पीएचडी आहेत.

IAS Dev Tomar | sarkarnama

लोकांनी मारले टोमणे

दरम्यान शिक्षण घेत असताना असो किंवा यूपीएससी तयारी करताना लोक त्यांना चंबळच्या दरोडेखोराचा नातू हा कधीही काहीही करू शकणार नाही, असे टोमना मारत.

IAS Dev Tomar | sarkarnama

पुणे शहराला शिस्त लावणाऱ्या 'डॅशिंग' अधिकाऱ्यावर आता जिल्ह्याच्या सुरक्षेची धुरा

आणखी पाहा