सरकारनामा ब्युरो
मुंबई पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
विद्यमान पोलिस आयुक्त विवेक फणसाळकर आज (30 एप्रिल) सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांच्यानंतर भारती यांची नियुक्ती झाली आहे.
मुंबईला जागतिक पातळीवर असलेल्या आर्थिक, राजकीय आणि सामाजिक महत्वामुळे इथले पोलीस आयुक्तपदीही तितकेच महत्वाचे आहे.
मुळचे बिहारचे असलेल्या देवेन भारती यांची कर्मभूमी महाराष्ट्र राहिली आहे. महाराष्ट्र पोलिसांमध्ये अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे.
देवेन भारती हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मानले जातात.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना, जे डे यांच्या मृत्यू प्रकरणासह अनेक हाय-प्रोफाइल प्रकरणांचा तपास केला होता.
दहशतवाद विरोधी पथकात कार्यरत असताना महत्वपूर्ण भूमिका त्यांनी बजावली होती. 26/11 च्या हल्ल्यातील आरोपी कसाबला फासावर चढवण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.
शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर गृहमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळी भारती यांची मुंबईचे विशेष पोलीस आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली होती.
मुंबई पोलिसांच्या इतिहासात प्रथमच विशेष आयुक्त (स्पेशल सीपी) हे पद निर्माण करण्यात आले. त्यांनाच या पदावर पहिली नियुक्ती मिळाली होती.
डेडलाइन संपली! अजूनही पाकिस्तान्यांंनी भारत सोडला नाही तर काय होणार कारवाई ? महत्त्वाची माहिती समोर