Rashmi Mane
कार्तिकी एकादशीनिमित्त गुरुवारी पहाटे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी पंढरपुरात श्री विठ्ठल रुक्मिणी यांची शासकीय महापूजा केली.
या वर्षीच्या महापूजेसाठी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीच्या वत्सला घुगे आणि बबन घुगे या शेतकरी दाम्पत्याला मानाचे वारकरी होण्याची संधी मिळाली.
कार्तिकी एकादशीच्या सोहळ्यासाठी वारकरी दरवर्षीप्रमाणं यंदाही मोठ्या संख्येनं पंढरपुरात दाखल होतात.
अवघी पंढरी नगरी ज्ञानबा तुकारामांच्या नामघोषात तल्लीन झाली आहे.
कार्तिकी एकादशीचे औचित्य साधत फडणवीसांनी आज पंढरपूर तीर्थक्षेत्र विकास आराखडा अंतर्गत मंजूर केलेल्या 73 कोटींच्या निधीतून पहिल्या टप्प्यातील 26 कोटींच्या विविध कामांचा शुभारंभ केला.
श्री विठ्ठल-रुक्मिणी मुख्य मंदिर संकुल जतन तसेच दुरुस्ती व संवर्धन प्रकल्प कामाचे भूमिपूजन यांचा समावेश आहे.
या वेळी मंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री तानाजी सावंत, मंत्री सुरेश खाडे, आमदार समाधान आवताडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी उपस्थित होते.