Rashmi Mane
उत्तर प्रदेशातील वैष्णवी पॉल यांनी UPSC परीक्षेत 62 वा क्रमांक मिळवला.
यूपीएससी परीक्षा देण्याची मुख्य प्रेरणा त्यांना वर्तमानपत्र वाचण्यातून मिळाली.
दिल्लीच्या लेडी श्रीराम कॉलेजमधून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी घेतली आहे.
वैष्णवी म्हणाल्या 'मला लहानपणी माझ्या वडिलांनी वर्तमानपत्र वाचण्याची सवय लावली. त्यामुळे मी लहानपणी जिल्हाधिकाऱ्यांनी हे कसे केले, एसपींनी हे केले अशा प्रकारच्या बातम्या वाचायचे.
वृत्तपत्र वाचणामुळेंच मला अधिकारी होण्याची प्रेरणा मिळाली.
UPSC परीक्षेत वैष्णवी यांनी चार प्रयत्नांनंतर यश मिळवले आणि त्यांच्या प्रचंड चिकाटीमुळे आणि मेहनतीच्या बळावर त्यांना हे यश प्राप्त झाले आहे.
वैष्णवी सांगतात त्यांच्या मेहनती व्यतिरिक्त वैष्णवीला तिचे पालक, शिक्षक आणि मित्रांकडून मिळालेल्या पाठिंब्यामुळे त्या हे यश प्राप्त करू शकल्या.