सरकारनामा ब्यूरो
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जपानच्या कोयासन विद्यापीठाने मानद डॉक्टरेट पदवी प्रदान केली.
मुंबई विद्यापीठातील दीक्षांत सभागृहात हा सोहळा उत्साहात पार पडला.
जपानच्या कोयासन विद्यापीठातून ही पदवी मिळवणारे देवेंद्र फडणवीस पहिले भारतीय ठरले.
120 वर्षांच्या इतिहासात कोयासन विद्यापीठाने प्रथमच मानद डॉक्टरेट पदवी देण्याचा निर्णय घेतला आहे.
फडणवीसांनी प्रत्येक क्षेत्रात केलेल्या उत्तम कामगिरीसाठी त्यांना ही डॉक्टरेट प्रदान करण्यात आली आहे.
जपान दौऱ्यात फडणवीस यांनी कोयासन विद्यापीठाला भेट दिली तेव्हा डीन सोएदा सॅन यांनी फडणवीस यांना डॉक्टरेट देण्याचे जाहीर केले होते.
भारतासाठी ऐतिहासिक क्षण असून प्रत्येकसाठी ही अभिमानाची बाब आहे.
यावेळी कोयासन विद्यापीठाचे प्रा. इन्युई रुनिन, वाकायामा प्रांताचे आंतरराष्ट्रीय व्यवहार विभागाचे संचालक यामाशिता योशियो, जपानचे मुंबईतील वाणिज्यदूत डॉ. फुकाहोरी यासुकाता हे उपस्थित होते.