सरकारनामा ब्यूरो
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे कोलकाता दौऱ्यावर आहेत.
‘वीर बाल दिवस’चे औचित्य साधून दोघांनी कोलकाता येथील गुरुद्वाराला भेट दिली.
गुरुद्वारा श्री बडी संगत साहिब येथे नतमस्तक होऊन आशीर्वाद घेतले.
आज 'वीर बाल दिवस' येथे सत्संग ऐकणे हे माझ्यासाठी मोठे सौभाग्य आहे, असे शाहांनी म्हटले आहे.
गुरुद्वारानंतर त्यांनी 51 शक्तीपीठांपैकी एक असलेल्या पवित्र कालीघाट मंदिराला भेट दिली.
कालीचे दर्शन घेतले आणि पूजा करून सर्वांच्या कल्याणासाठी शुभेच्छा दिल्या.
नवी दिल्लीला रवाना होण्यापूर्वी ते संघटनात्मक बैठकांचे सत्र घेणार आहेत.
पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघटनात्मक बांधणीसाठी शाह आणि नड्डा यांचा हा दौरा महत्त्वाचा आहे.