सरकारनामा ब्यूरो
मंत्रिमंडळात खातेवाटप झाल्यानंतर गुरुवारी (ता.2 जानेवारी) प्रशासकीय सोयीसाठी देवेंद्र फडणवीस यांनी 10 IAS अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. ते अधिकारी कोण आहेत पाहूयात..
जयश्री भोज या महाआयटीमध्ये होत्या त्यांची बदली अन्न आणि नागरी पुरवठा सचिव म्हणून करण्यात आली आहे.
साताऱ्याचे जिल्ह्याधिकारी असलेले डुड्डी यांची पुणे जिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली आहे.
कामगार सचिव असलेले सिंघल या आता पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव असणार आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या सचिव आय ए कुंदन यांची बदली कामगार विभागाच्या सचिवपदी करण्यात आली आहे.
मिलिंद म्हैसकर यांना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी कार्यभार देण्यात आला आहे.
IAS वेणुगोपाल रेड्डी यांच्याकडे उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि वन विभागाच्या अतिरिक्त सचिवपद देण्यात आले आहे.
प्रकल्प संचालक रुसा तसेच सार्वजनिक आरोग्य विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे.
संतोष पाटील यांची बदली सातारचे जिल्हाधिकारी म्हणून करण्यात आली आहे.
हर्षदीप कांबळे यांची नियुक्ती सामाजिक न्याय विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.
विकासचंद्र रस्तोगी यांच्याकडे दोन विभागांचा कारभार देण्यात आला असून उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव तसेच कृषी विभागाचे प्रधान सचिव म्हणून त्यांची नियुक्ती केली आहे.