सरकारनामा ब्यूरो
जालना ते मुंबई वंदे भारत एक्स्प्रेस रेल्वे सुरू सेवा करण्यात आली, असून तिचे उद्घाटन करण्यात आले आहे.
या रेल्वेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन केले.
या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही वंदे भारत रेल्वेला आॅनलाईन पद्धतीने उपस्थित राहून हिरवा झेंडा दाखवला आहे.
जालना रेल्वे स्थानक येथे आयोजित या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, पालकमंत्री आणि विरोधी पक्ष नेत्यांनी उपस्थिती लावली.
सुरक्षेच्या दृष्टीने या शुभारंभ कार्यक्रमासाठी कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
रेल्वे सेवेचा शुभारंभ झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी सहकाऱ्यांसोबत वेगवान रेल्वेप्रवासाचा अनुभव घेतला
प्रवासादरम्यान यंत्रणेतील सर्व व्यक्तींशी संवाद साधत रेल्वेची यंत्रणा आणि कामकाज समजावून घेतले.
प्रवासाचा आनंद घेतानाचे सर्व फोटो सोशल मीडियावर शेअर करत माहिती देण्यात आली आहे.