Akshay Sabale
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नवी दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
फडणवीस यांच्यासोबत पत्नी अमृता आणि मुलगी दिविजा उपस्थित होत्या.
यानंतर 'एक्स' पोस्टमध्ये फडणवीस म्हणाले, पंतप्रधान मोदींचा आशीर्वाद सदैव महाराष्ट्रासोबत राहिला आहे आणि यापुढेही राहिल.
पंतप्रधान मोदींच्या भेटीनं प्रत्येकवेळी नवी उर्जा मिळते आणि त्यांचे मार्गदर्शन प्राप्त होते, असं फडणवीसांनी म्हटलं.
भाजपनं देशातील भाजपशासित मुख्यमंत्र्यांची एक बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीसाठी देवेंद्र फडणवीस दिल्ली दौऱ्यावर होते.
या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांना मानाचं स्थान देण्यात आलं होतं. बैठक मुख्यमंत्र्यांची होती. पण, उपमुख्यमंत्री असूनही ते फोटोसेशनसाठी पहिल्या पक्तींत होते.
या बैठकीच्या रूपानं उपमुख्यमंत्री फडणवीस यांचं दिल्लीत मानाचं स्थान कायम असल्याचं म्हटलं जात आहे.