मुख्यमंत्री कार्यालयाला नवा पत्ता! 'या' आलिशान इमारतीतून चालणार महाराष्ट्राचा कारभार

Ganesh Sonawane

नवा पत्ता

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मंत्रालयातील कार्यालय लवकरच नरिमन पॉइंट येथील 23 मजली एअर इंडिया इमारतीत स्थलांतरित होणार आहे.

Devendra Fadnavis' New Office Air India Building

23 वा मजला

मुख्यमंत्र्यांचे नवे कार्यालय एअर इंडिया इमारतीच्या सर्वात वरच्या म्हणजेच 23 व्या मजल्यावर असणार आहे.

Devendra Fadnavis' New Office Air India Building

सरकारी विभागही हलणार

केवळ मुख्यमंत्री कार्यालयच नव्हे, तर मंत्रालयाबाहेरील अनेक सरकारी विभागांची कार्यालयेही या इमारतीत स्थलांतरित होणार आहेत.

Devendra Fadnavis' New Office Air India Building

वर्षाला 200 कोटींची बचत

सध्या सरकार विविध विभागांसाठी मोठ्या प्रमाणावर भाड्याने जागा वापरत आहे. नवीन इमारतीत स्थलांतर झाल्यानंतर भाड्यापोटी होणारा सुमारे 200 कोटी रुपयांचा वार्षिक खर्च वाचण्याची अपेक्षा आहे.

Devendra Fadnavis' New Office Air India Building

जागेच्या कमतरतेवर उपाय

1955 मध्ये बांधलेल्या सचिवालय आणि विद्यमान मंत्रालयात जागेची तीव्र कमतरता निर्माण झाली आहे. यामुळे सरकारला सुमारे 90 लाख चौरस फूट जागा भाड्याने घ्यावी लागत आहे.

Devendra Fadnavis' New Office Air India Building

1601 कोटींना खरेदी

राज्य सरकारने नरिमन पॉइंट येथील 23 मजली एअर इंडिया इमारत 1,601 कोटी रुपयांना खरेदी केली आहे. 1994 मध्ये राज्य सरकारच्या जमिनीवर उभारलेली ही इमारत आता सरकारच्या ताब्यात आली आहे.

Devendra Fadnavis' New Office Air India Building

अत्याधुनिक कॅबिनेट हॉल

इमारतीच्या 22 व्या मजल्यावर 13,663 चौरस फूट क्षेत्रफळाचा अत्याधुनिक कॅबिनेट हॉल उभारण्यात येणार आहे.

Devendra Fadnavis' New Office Air India Building

NEXT : पेलेट गनवर बंदी शक्य आहे का? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटलं..

येथे क्लिक करा