Mayur Ratnaparkhe
गुरुवर्य कै. लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे-कठापूर) जि. सातारा या प्रकल्पाचे जलपूजन उपमुख्यमंत्री फडणवीसांनी केले.
या पाण्यासाठी आमदार जयकुमार गोरे यांनी मोठा संघर्ष केला.
22 जानेवारीला प्रभू श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा झाली आणि त्याच दिवशी आंधळीच्या धरणात पाणी पोहोचले.
प्रकल्पातून 15,170 हेक्टर सिंचन निर्मिती होत आहे. याचा लाभ 27 गावांना मिळणार आहे.
यावेळी आंधळी धरणातील या प्रकल्पाची फडणवीसांनी होडीतून पाहणी केली.
3.17 अब्ज घनफूट पाणी कृष्णा नदीतून उचलून खटाव आणि माण तालुक्यात आणले जात असून एकूण 27,500 हेक्टर क्षेत्राला याचा लाभ होणार आहे.
विविध योजनांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार आहे, असं यावेळी फडणवीस म्हणाले.
फडणवीसांनी नागरिकांसोबत ढोल वाजवून आनंदोत्सवात सहभाग नोंदवला.
जे सरकार पाणी देते त्यांना ईश्वर रुपी जनता आशीर्वाद देते, अशी भावना फडणीसांनी व्यक्त केली.
NEXT : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लुटला स्कुबा डायव्हिंगचा आनंद; पाहा पंचकुईतील खास PHOTO