Sunil Balasaheb Dhumal
द्वारका येथे नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्रे मोदींचे जल्लोषात स्वागत केले.
नरेंद्र मोदींनी द्वारका शंकराचार्य स्वामी सदानंद सरस्वती यांचे दर्शन घेतले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुजरातमधील पंचकुई समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंगचा आनंद लुटला.
तेथे त्यांनी भगवान कृष्णाच्या बुडालेल्या द्वारका या प्राचीन शहराच्या ठिकाणी पूजा केली.
मोदी म्हणाले, खोल समुद्रात जाऊन प्राचीन द्वारका शहराचे दर्शन केले. ते क्षण माझ्यासोबत कायमचे राहतील.
मोदींनी स्कुबा डायव्हिंग करताना एक मोरपंख घेतला होता. तो त्यांनी भगवान श्रीकृष्णाच्या चरणी ठेवला.
खोल समुद्रात देवत्वाचा अनुभव आला. द्वारकाधीशासमोर नतमस्तक झालो, अशा भावना पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या.