Rajanand More
पुढील काही दिवसांत मंत्रिमंडळात मोठे फेरबदल होण्याचे संकेत मिळत आहेत. काही मंत्र्यांना डच्चू दिला जाऊ शकतो, तर काहींची खाती बदलली जाऊ शकत अशी चर्चा आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हिटलिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचे नाव असेल. विधिमंडळात मोबाईलवर रम्मी खेळतानाचा त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.
सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांचेही मंत्रिपद जाऊ शकते. त्यांच्याभोवतीही अनेक वाद निर्माण झाले आहेत.
राज्याचे मत्स्यपालन मंत्री नीतेश राणे यांच्या विधानांवरून वाद निर्माण झाला होता. त्यावरून महायुतीतही वादाची ठिणगी पडली होती.
रोजगार हमी मंत्री भरत गोगावलेही फडणवीसांच्या हिटलिस्टमध्ये असल्याची चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांच्यावर अघोरी पूजेचा आरोप झाला होता.
फडणवीसांचा हात आपल्या डोक्यावर असल्याचे सांगणारे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचेही मंत्रिपद धोक्यात असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात आहे.
मुंबईतील सावली बारवरून वादात सापडलेले गृह राज्यमंत्री योगेश कदम यांचे मंत्रिपद धोक्यात आले आहे.
अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांचे खाते बदलले जाण्याची जोरदार चर्चा आहे. हे मंत्रिपद मिळाल्यापासूनच ते नाराज असल्याची चर्चा होती.
शालेय शिक्षण मंत्री दादा भूसे यांचे खाते त्रिभाषा धोरणावरून वादात अडकले आहे. हिंदी भाषेवरून वाद निर्माण झाल्यानंतर सक्तीबाबतचे दोन जीआर सरकारला रद्द करावे लागले होते.