Devendra Fadnavis favorite web series : देवेंद्र फडणवीस बघतायत एक जबरदस्त क्राईम थ्रिलर वेब सिरीज... जाहीरपणे सांगितलं नाव

Rashmi Mane

आवडती वेब सिरीज

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या मनोरंजनाच्या आवडींबाबत पहिल्यांदाच खुलासा केला आहे. कामाच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ मिळाल्यावर ते काही निवडक कार्यक्रम आणि वेब सिरीज पाहत असल्याचे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis favorite web series | Sarkarnama

आवडीच्या यादीत

फडणवीस म्हणाले की, सध्या ते ‘इंडियन आयडॉल’ हा लोकप्रिय गायन कार्यक्रम नियमितपणे पाहतात. वेळ मिळावा म्हणून त्यांनी हा कार्यक्रम डाउनलोड करून ठेवला असून फावल्या वेळेत ते पाहतात.

Devendra Fadnavis favorite web series | Sarkarnama

सिरीजचीही पसंती

फक्त रिअॅलिटी शोच नव्हे, तर वेब सिरीज पाहण्याचीही त्यांना आवड आहे. त्यांनी सांगितले की, दोन-तीन सिरीज नेहमी डाउनलोड करून ठेवलेल्या असतात आणि वेळ मिळेल तसे त्या पाहतात.

Devendra Fadnavis favorite web series | Sarkarnama

सध्या पाहत आहेत

फडणवीस यांनी सध्या नेटफ्लिक्सवरील ‘द ब्लॅकलिस्ट’ ही वेब सिरीज पाहत असल्याचे जाहीरपणे सांगितले. क्राईम आणि थ्रिलर प्रकारातील ही मालिका जगभरात लोकप्रिय मानली जाते. प्रवासात जेव्हा वेळ मिळतो तेव्हा ते अशा प्रकारचे कार्यक्रम बघतात असे त्यांनी सांगितले.

Devendra Fadnavis favorite web series | Sarkarnama

काय आहे 'द ब्लॅकलिस्ट'ची कथा?

ही सिरीज एक रहस्यमय आंतरराष्ट्रीय गुन्हेगाराभोवती फिरते. तो स्वतःहून तपास यंत्रणेशी संपर्क साधतो आणि अनेक मोठ्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी मदत करतो.

Devendra Fadnavis favorite web series | Sarkarnama

गुन्हेगार की माहितीदार?

मालिकेतील मुख्य पात्र रेमंड रेडिंग्टन हे जगातील सर्वाधिक शोधल्या जाणाऱ्या फरारींपैकी एक आहे. मात्र तो एफबीआयसोबत काम करत असल्याने कथेत सतत नवे ट्विस्ट आणि रहस्य निर्माण होत राहतात.

Devendra Fadnavis favorite web series | Sarkarnama

प्रेक्षकांना खिळवून ठेवणारी मालिका

प्रत्येक भागात नवे गुन्हे, धक्कादायक खुलासे आणि अनपेक्षित वळणे पाहायला मिळतात. त्यामुळे ‘द ब्लॅकलिस्ट’ ही मालिका क्राईम थ्रिलर चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय ठरली आहे.

Devendra Fadnavis favorite web series | Sarkarnama

Next : ...तर पंतप्रधान, मुख्यमंत्री यांनाही राजीनामा द्यावा लागणार, मोदी सरकार नवे विधेयक मांडणार!

येथे क्लिक करा