झारखंडमधील विद्यार्थी आंदोलनाचा प्रमुख चेहरा अन् सोनम वांगचुक यांच्याशी तुलना : देवेंद्र नाथ महतो यांची हिस्ट्री काय?

Jagdish Patil

झारखंड

14 व्या JPSC नागरी सेवा पूर्व परीक्षेच्या निकालात कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत झारखंडमध्ये विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले.

Devendra Nath Mahato | Sarkarnama

मागणी

आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा रद्द करून संपूर्ण प्रकरणाची CBI आणि ED मार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.

Devendra Nath Mahato | Sarkarnama

संताप

या आंदोलनांची सरकारने दखल न घेतल्याने विद्यार्थ्यांचा संताप वाढत गेला.

Devendra Nath Mahato

देवेंद्र नाथ महतो

सरकारचे लक्ष वेधण्यासाठी 2 ऑगस्टच्या रात्री रांचीतील जयपाल सिंग मुंडा स्टेडियमवर देवेंद्र नाथ महतो यांनी आमरण उपोषण सुरू केले.

Devendra Nath Mahato | Sarkarnama

शिक्षण

रांची जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या महतो यांनी बी.एड. आणि पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले असून, ते 2015 पासून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सक्रिय आहेत.

Devendra Nath Mahato

निवडणूक

महतो यांनी 2024 च्या झारखंड विधानसभा निवडणुकीत तमाड मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती.

Devendra Nath Mahato | Sarkarnama

तुलना

शांततामय आंदोलन आणि आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारल्यामुळे समर्थकांनी त्यांची तुलना सोनम वांगचुक यांच्याशी केली.

आवाहन

शरीर अशक्त झाले असले तरी हे आंदोलन पूर्णपणे शांततामय व संविधानिक मार्गाने सुरू ठेवण्याचे त्यांनी आवाहन केलं आहे.

Devendra Nath Mahato | Sarkarnama

प्रमुख चेहरा

JPSC आंदोलनामुळे देवेंद्र नाथ महतो हे झारखंडमधील विद्यार्थी चळवळीचा प्रमुख चेहरा बनले आहेत.

Devendra Nath Mahato | Sarkarnama

NEXT : 89 जणांचा मृत्यू; हजारो संसार उद्ध्वस्त, गाड्याही गेल्या वाहून : आसाममधील पुराचे हृदयद्रावक फोटो!

Assam Floods
क्लिक करा