सरकारनामा ब्युरो
करूणा शर्मा यांनी साम टीव्हीला दिलेल्या विशेष मुलाखतीत धनंजय मुंडे यांच्यासोबत त्यांच्या लव्ह स्टोरीबाबतही सांगितलं.
ते कशाप्रकारे एकत्र आले, लग्न केलं आणि २७ वर्षे सोबत राहिले याबाबत करूणा शर्मा यांनी सगळंच सांगितलं.
मी धनंजय मुंडेंना भेटले तेव्हा मी केवळ १६ वर्षांची होती. मी केवळ नववी पास होते आणि मी शिक्षणही सोडले होते.
भैय्यू महाराज यांचा इंदुरमध्ये सुकल्या ग्राममध्ये आश्रम होता. त्यांच्या आश्रमात गोपीनाथ मुंडे, धनंजय मुंडे आणि महाराष्ट्रातील सर्वच मोठमोठे मंत्री तिथे यायचे.
मी कधीच आश्रमात जात नसे, परंतु एकदा मी माझ्या आईसोबत तिकडे गेले होते. तिथे आमच्या दोघांची पहिल्यांदा भेट झाली.
एवढंच नाहीतर आमची टक्कर झाली होती. असं सगळं आमचं एकदम फिल्मी आहे.
पुढे आमचं इंदुरमध्ये लग्न झालं आणि ते मला मुंबईत घेवून आले होते. मी मूळची इंदुरची आहे.
मी जेव्हा मुंबईत आले तेव्हा माझी सगळी व्यवस्था राहणं, खाण्याची सोय ही माझ्या नवऱ्याने म्हणजेच धनंजय मुंडेंनीच केली होती.