Maharashtra CM Fellowship ची घोषणा; महिन्याला 61,500 पगार, लवकर करा अर्ज

सरकारनामा ब्युरो

राज्यातील तरुणांना प्रशासनासोबत कामाचा अनुभव मिळावा यासाठी मुख्यमंत्री फेलोशिप कार्यक्रम योजना जाहीर झाली आहे.

Devendra Fadnavis | sarkarnama

2025-26 या वर्षाकरता या कार्यक्रमात 60 फेलोंची निवड करण्यात येणार आहे. फेलोंचा दर्जा हा शासकीय सेवेतील गट-अ अधिकाऱ्यांच्या समकक्ष असेल.

Devendra Fadnavis | Sarkarnama

फेलोंना दरमहा मानधन रुपये 56,100/- व प्रवासखर्च रुपये 5,400/- असे एकत्रित रुपये 61,500/- छात्रवृत्तीच्या स्वरुपात देण्यात येतील.

Devendra Fadnavis | sarkarnama

कल्पकता व वेगळा विचार मांडण्याची क्षमता, उत्साह, तंत्रज्ञानाची आवड यांचा उपयोग प्रशासनास व्हावा आणि या माध्यमातून प्रशासकीय प्रक्रियांमध्ये गतिमानता यावी हाही या योजनेचा उद्देश आहे.

Devendra Fadnavis | sarkarnama

यासाठी अर्जदार भारताचा नागरिक असावा, त्याचे वय 21 ते 26 वर्ष असावे आणि कोणत्याही शाखेतील पदवीधर किमान 60 टक्के गुणांसह उत्तीर्ण असावा.

Students

याशिवाय किमान 1 वर्षाचा पूर्णवेळ कामाचा अनुभव आवश्यक आहे. तसेच, व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांसाठी पूर्णवेळ इंटर्नशिप / अप्रेंटीसशिप /आर्टीकलशिपसह 1 वर्षाचा अनुभव आवश्यक आहे.

Students

पूर्णवेळ स्वयंरोजगार, स्वयंउद्योजकतेचा अनुभवही ग्राह्य धरण्यात येईल. अर्जदारास तसे स्वयंघोषणापत्र सादर करावे लागेल.

Students

मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच, संगणक हाताळणी आणि इंटरनेटचे ज्ञान आवश्यक राहील.

Students

फेलोशिपसाठी ऑनलाईन अर्ज करून ऑनलाईन परीक्षा शुल्क भरावे लागेल. अर्जाकरिता शुल्क 500 रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

Students

निवड झालेल्या फेलोंसाठी आयआयटी, मुंबई यांच्या सहकार्यातून स्वतंत्र सार्वजनिक धोरण या विषयातील पदव्युत्तर प्रमाणपत्र अभ्यासक्रम आयोजित केला जाईल.

Students

जगजीवन राम देशाचे पहिले दलित पंतप्रधान झाले असते पण अश्लील फोटोमुळे...

Jagjivan Ram | sarkarnama
<strong>येथे क्लिक करा</strong>