Dhananjay Munde: संतोष देशमुख प्रकरणामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेल्या मुंडेंच्या संपत्तीचा आकडा ऐकलात का?

सरकारनामा ब्यूरो

धनंजय मुंडे

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला आहे.

Dhananjay Munde | Sarkarnama

राजीनामा

मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुंडे यांना राजीनामा देण्याचे आदेश दिले होते. तर पाहूयात मंत्री धनंजय मुंडे किती कोटीचे मालक आहेत.

Dhananjay Munde | Sarkarnama

संपत्तीचा आकडा-

धनंजय मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या शपथपत्रात त्यांच्या संपत्तीचा आकडा जवळपास 53.80 कोटी रुपये इतका आहे.

Dhananjay Munde | Sarkarnama

संपत्तीत दुपटीने वाढ

निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या शपथपत्रातून मुंडे यांच्या संपत्तीत गेल्या पाच वर्षांमध्ये दुपटीने वाढ झाल्याची माहिती समोर आली.

Dhananjay Munde | Sarkarnama

दागिने

मुंडे यांच्याकडे 2019 मध्ये 23 कोटींची संपत्ती होती. 2023 ला त्यांच्याकडे दीड किलो चांदी आणि 23 लाख सोन्यांच्या दागिन्याचा समावेश आहे.

Dhananjay Munde | Sarkarnama

कुटुंबाची संपत्ती

मुंडे यांच्या पत्नी आणि कुटुंबाकडे एकूण 53 कोटी 80 लाख रुपयांची संपत्ती आहे. मागील पाच वर्षात या संपत्तीत दुपटीने म्हणजे 30.75 कोटी रुपयांची वाढ झाली.

Dhananjay Munde | Sarkarnama

वाहने

मुंडे यांच्याकडे 15 कोटी रुपये किमतीची सात वाहने आहेत. यामध्ये टँकर बुलेटचा समावेश आहे.

Dhananjay Munde | Sarkarnama

NEXT : संतोष देशमुख प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या धनंजय मुंडेंचा 'असा' राहिलाय राजकीय प्रवास...

येथे क्लिक