सरकारनामा ब्यूरो
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड हा मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असल्याने त्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली होती.
हत्येचे फोटो व्हायरल झाल्याने अखेर अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला आहे. तर त्याच पार्श्वभूमीवर जाणून घेऊयात मुंडे यांचा राजकीय प्रवास...
महाविद्यालयीन शिक्षण पुण्यातील सिम्बॉयसिस कॉलेज तर,'सोशल सायन्स' या विषयात धनंजय मुंडे यांनी डिग्री मिळवली.
1995च्या विधानसभाच्या निवडणुकीपासून संसदीय राजकारणात येत पक्षपातळीवरील राजकारणात ते सक्रीय झाले. भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे असल्याने त्यांना राजकीय धडे घरातूनच मिळाले.
मुंडे यांनी सुरुवातीला भाजपचे विद्यार्थी आघाडीचे प्रमुख म्हणून काम करत होते. यानंतर त्यांनी भारतीय जनता युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस आणि प्रदेशाध्यक्ष या पदांवर अनेक वर्षे काम करत कारकीर्द गाजवली.
धनंजय यांनी 2012ला भाजपला सोडचिठ्ठी दिली, आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.
2014च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पंकजा मुंडेंच्या विरोधात पराभवाचा सामना करावा लागला. 2019 च्या निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडे यांचा 30,000 मतांनी पराभव केला. यावेळी ते बीड जिल्ह्याचे पालकमंत्री झाले.
2023 ला शरद पवार यांची साथ सोडून ते अजित पवार यांच्या पक्षात गेले. त्यांनी भाजपसोबतच्या सत्तेत सहभागी झाले.
2023ला धनंजय मुंडे यांच्याकडे कृषीमंत्रीपद सोपवण्यात आले होते. 2024 मध्ये विधानसभेची निवडणूक जिंकल्यानंतर त्यांना कॅबिनेटमंत्री, अन्न आणि नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण खात हे पद देण्यात आले.