Deepak Kulkarni
धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा देऊन 5 महिन्यांचा कालावधी लोटला. पण त्यांनी 'सातपुडा' बंगला सोडलेला नाही.
राजीनाम्यानंतरही सरकारी बंगला सोडला नाही तर दंड आकारला जातो. नियमानुसार त्यांची दंडाची रक्कम तब्बल 42 लाखांवर पोहोचली आहे.
धनंजय मुंडे विधानसभा निवडणुकीच्या वेळी दिलेल्या शपथपत्रात मुंबईतील गिरगाव चौपाटीमध्ये अलिशान फ्लॅट असल्याचा उल्लेख आहे. तो त्यांच्या पत्नी आणि स्वतःच्या नावे 2023 मध्ये खरेदी केल्याचंही समोर आलं आहे.
पण धनंजय मुंडेंची एकूण संपत्ती किती आहे पाहुयात... विधानसभेच्या 2024 च्या निवडणुकीसाठी धनंजय मुंडे यांनी उमेदवारी अर्ज भरताना सादर केलेल्या शपथपत्रात त्यांच्याकडे 53.80 कोटींची संपत्ती असल्याचं नमूद केलं आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडे 15 कोटींची वाहने असून त्यात इनोव्हा कार, मर्सिडीज बेंझ जीएलएस ४००, महिंद्रा स्कॉर्पिओ कार, टाटा मोटर्स हेक्सा यांसारख्या कारचा समावेश आहे.
मुंडेंकडे त्यांच्या पत्नीच्या नावे 22 लाख 90 हजारांचे 620 ग्रॅम सोने आणि दीड किलो चांदी असल्याचंही म्हटलं आहे.
धनंजय मुंडे यांच्याकडे 2019 च्या निवडणुकीवेळी एकूण 23 कोटींची संपत्ती असल्याचा उल्लेख शपथपत्रात केला होता.
धनंंजय मुंडे यांच्याकडे मुंबईतील गिरगाव चौपाटी येथे 1 ,पुण्यात 2, परळी शहरात 1 असे चार फ्लॅट असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच करुणा मुंडेंनी मात्र मुंबईतच चार फ्लॅट असल्याचा दावा केला आहे.