Aslam Shanedivan
कल्याण-डोंबिवली महापालिकेने 15 ऑगस्टला मांस विक्री बंदी घातली. याबाबत आदेश काढला होता. ज्यानंतर राजकारण तापलं होते.
कल्याण-डोंबिवली महापालिकेप्रमाणेच आणखी 6 महापालिकांनी अशाच पद्धतीने आदेश काढले होते. ज्यात नाशिक, मालेगाव, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, इचलकरंजी या महापालिकांचा समावेश आहे.
या आदेशानंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं असून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संताप व्यक्त करताना जोरदार टीका केली होती.
ज्या दिवशी देशाला स्वतंत्र मिळाले त्याच दिवशी आमचं स्वतंत्र हिरावून घेत आहात. हा काय तमाशा आहे? असा सवाल उपस्थित केला होता.
या निर्णयाविरोधात एकीकडे विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली असतानाच हा निर्णय काँग्रेसचाच असल्याचा पलटवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला होता.
एकीकडे मांसविक्रीवर बंदीवरून राज्यातील वातावरण तापलेलं असतानाच अजित पवार यांनी यावर नाराजी व्यक्त केली. त्यांनी ‘अशी बंदी घालणं उचित नसल्याचे म्हटलं होते.
या निर्णयानंतर आता प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी लोकांनी काय खावं आणि काय नाही? याचा निर्णय सरकार घेणार असेल तर अवघड असल्याची टीका केली आहे.