Vijaykumar Dudhale
कोणी दुसऱ्यानं मेळावा घेतल्यानं परंपरा संपत नाही. दसरा त्याला माहीत आहे, त्याला प्रभू रामचंद्र माहीत असले पाहिजेत. प्रभू रामचंद्रांशिवाय या दसऱ्याचं महत्त्व आहे का? या पुढचं मी काय बोलणार नाही. तुम्ही समजून घ्या. संपला विषय
आज खरंच खूप भारावून गेलो आहे. 12 वर्षांच्या, एका तपानंतर दसऱ्या मेळाव्याला आलो आहे.
संत भगवान बाबांच्या पवित्र हातांनी सोनं देऊन हा दसरा मेळावा सुरू व्हायचा. ही पवित्र परंपरा गोपीनाथ मुंडेसाहेबांनी चालवली. त्यानंतर माझ्या भगिनी पंकजाताई चालवत आहे. त्याचा मला अभिमान आहे.
मी 12 वर्षाचा प्रारब्ध भोगला, त्यांनी भोगला. तो प्रारब्ध आता संपला. राजकारण, निवडणूक यापलीकडे, विचारांचा, भक्तीचा, शक्तीचा, स्वर्गीय मुंडेसाहेबांचा परंपरेचा हा 'शक्ती-भक्ती' दसरा मेळावा आहे.
मुंडेसाहेबांचा संघर्ष स्वतःसाठी नव्हता. पंकजाताईंचा संघर्ष स्वतःसाठी नव्हता. आमचा संघर्ष मायबाप जनतेसाठी होता. मुंडेसाहेबांच्या संघर्षांच्या काळातील लढाई, पंकजाताईंनी सुरू ठेवलीय. आता या लढाईत ताईंच्यामागे एक होऊन उभं राहयचं आहे.
भगवान गडाच्या भूमिपुजनाला तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण आलं होते. या गडाला यशवंतराव चव्हाण यांनी भगवानगड हे नावं दिलं.
एक प्रामाणिकपणे सांगतो, भलं माझं पंकजाताईंशी 12 वर्ष जमलं नाही, पण त्या काळात कधी मनात सुद्धा आणलं नाही की, आपण दसरा मेळावा घ्यायचं. जो वारसा दिला आहे, त्यानं तो पुढं नेला.