Deepak Borhade : धनगर समाजाला मिळाले मनोज जरांगेच्या तोडीस तोड नेतृत्व, कोण आहेत दीपक बोऱ्हाडे?

Roshan More

आरक्षणासाठी एल्गार

धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी दीपक बोऱ्हाडे हे जालन्यात उपोषण करत आहेत.

लाखोंचा मोर्चा

जालन्यात बोऱ्हाडे यांच्या नेतृत्वाखाली प्रचंड मोठा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चानंतर मराठा समाजाला मनोज जरांगेंच्या तोडीत तोड नेतृत्व मिळाल्याची चर्चा सुरू झाली.

दीपक बोऱ्हाडे

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी बोऱ्हाडे यांनी पोलिस खात्यातील आपल्या नोकरीचा राजीनामा 2014 च्या दरम्यान दिला. त्यानंतर ते आंदोलनात पूर्णवेळ सक्रीय झाले.

निवडणुकीच्या मैदानात

2014, 2019, 2024 ची विधानसभा निवडणूक लढली. 2024 मध्ये ते 'वंचित'चे उमेदवार होते. त्यांना सर्व निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला.

आरक्षणासाठी आंदोलन

धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी त्यांनी रास्ता रोके, निवेदन देत आंदोलन केले. 2023 मध्ये मंत्रालयावरून उड्या मारल्या होत्या.

मोर्चाला हिंसक वळण

नोव्हेंबर 2023 मध्ये त्यांनी जालन्यात केलेल्या आंदोलनाला हिंसक वळण लागले होते. आंदोलकांनी जिल्हाधिकारी कार्यालय फोडले होते.

जालन्यात उपोषण

आरक्षणाच्या मागणीसाठी जालन्यातली अहिल्यादेवी होळकर नियोजित स्मारक ठिकाणी ते उपोषण करत आहेत. आज (ता.25) त्यांच्या उपोषणाचा 9 व्वा दिवस होता.

NEXT : मराठा आरक्षणाविरोधात दाखल केलेली 'रिट याचिका' म्हणजे काय असते?

येथे क्लिक करा