Rajanand More
धनराज नथवाणी हे रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड ग्रुप प्रेसिडेंड असून गुजरात क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्षही आहेत. त्यांनी राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केल्याने त्यांचे नाव चर्चेत आले आहे.
समाजवादी पक्षाने नथवाणी यांना उत्तर प्रदेशातून राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली आहे. पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासोबत जात त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
धनराज यांचे वडील परिमल नथवाणी हेही राज्यसभेचे खासदार आहेत. झारखंडमधून भाजपच्या पाठिंब्यावर अपक्ष उमेदवार म्हणून ते विजयी झाले आहेत.
झारखंडमधील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा व काँग्रेसच्या आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याने ते विजयी झाल्याचा दावा केला जात आहे.
आता धनराज यांच्या उमेदवारीमुळे भाजपाला हादरा बसला आहे. भाजपमधूनच कॉस वोटिंगची शक्यता व्यक्त केली जाऊ लागली आहे.
धनराज यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर त्यांच्यासोबत काही तासांतच भाजप सरकारचे मंत्री राकेश सचान दिसून आले. विशेष अखिलेशही त्यावेळी उपस्थित होते.
एकूण दहा जागांवर निवडणूक होत असून संख्याबळानुसार भाजपच्या सात आणि सपाच्या दोन जागा विजयी होऊ शकतात. एका जागेसाठी दोन्ही पक्षांकडे पुरेसे संख्याबळ नाही.
नथवाणी हे सपाचे तिसरे उमेदवार निश्चित झाल्यास भाजपला क्रॉस वोटिंगची धास्ती आहे. नथवाणी यांचे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत निकटचे संबंध आहेत. वडील भाजपच्या पाठिंब्यावर खासदार झाले आहेत. तसेच गुजरात कनेक्शनमुळे त्यांचे पारडे जड मानले जाते.