आणखी एक सुपरस्टार राजकारणात? CM विजय यांच्या पावलावर टाकले पाऊल...

Rajanand More

CM विजय

तमिळनाडूतील सुपरस्टार थलापती विजय यांनी टीव्हीके पक्षाची स्थापना करत विधानसभा निवडणूक लढविली अन् पहिल्याच निवडणुकीत सत्ताही काबीज केली. सध्या ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत.

Thalapathy Vijay | Sarkarnama

धनुष

तमिळनाडूतील प्रसिध्द अभिनेते धनुष यांनीही विजय यांच्या पावलावर पाऊल टाकले असून लवकरच त्यांचीही राजकारणात एन्ट्री होणार असल्याची जोरदार चर्चा आहे.

Dhanush (FB) | Sarkarnama

नवी संघटना

तमिळनाडूतील धनुष यांच्या फॅन्सने 'धनुष नरपणी इयक्कम' ही सामाजिक संघटना सुरू केली आहे. कोईम्बतूर येथे झालेल्या बैठकीला सुमारे ३ हजारांहून अधिक चाहते व संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

Dhanush (FB) | Sarkarnama

संघटन बांधणी

बैठकीत सामाजिक कामावर भर, संघटनात्मक शिस्त आदी मुद्यांवर चर्चा झाली. संघटनेच्या माध्यमातून धनुष यांचे सामाजिक कामही लोकांपर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न आहे.

Dhanush (FB) | Sarkarnama

धनुष गैरहजर

धनुष यांची या बैठकीला गैरहजेरी असली तरी चाहत्यांनी उचललेल्या या पावलामुळे त्यांच्या राजकीय एन्ट्रीबाबत तर्कवितर्क लढविले जाऊ लागले आहे. कारण विजय यांची सुरूवातही अशीच झाली होती. धनुष किंवा चाहत्यांनी राजकारणाबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही.

Dhanush (FB) | Sarkarnama

टीव्हीकेकडून स्वागत

टीव्हीकेने धनुष यांच्या राजकीय एन्ट्रीच्या चर्चेचे स्वागत केले आहे. मुख्यमंत्री विजय यांचा सिनेमापासून मुख्यमंत्रिपदापर्यंतचा प्रवास नव्या राजकीय पक्षांसाठी प्रेरणादायी ठरल्याचे पक्षाने म्हटले आहे.

Dhanush (FB) | Sarkarnama

लोकप्रिय

धनुष हा दक्षिणेतील लोकप्रिय अभिनेता असून अनेक हिट चित्रपट दिले आहे. त्यांना दोनदा राष्ट्रीय पुरस्कारही मिळाला आहे. त्यासोबत फिल्मफेअरसह अनेक पुरस्कारांचे ते मानकरी आहेत.

Dhanush (FB) | Sarkarnama

२३० कोटींची संपत्ती

मीडिया रिपोर्ट्सनुसार, धनुष यांची एकूण संपत्ती सुमारे २३० कोटी रुपये आहे आहे. एका चित्रपटासाठी ते २० ते २५ कोटी रुपये मानधन घेतात.

Dhanush (FB) | Sarkarnama

NEXT : दलितांना मिळवून दिला मंदिरात प्रवेश; 'या' महिला IPS अधिकाऱ्यांनी घडविला इतिहास...

येथे क्लिक करा.