Roshan More
धाराशिवसाठी महायुतीच्या उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे. अर्चना पाटील या डॉ. पद्मसिंह पाटील यांच्या स्नुषा आणि राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी आहेत.
अर्चना पाटील यांनी राजकारणात येण्यापूर्वी धाराशिव लेडीज क्लबच्या माध्यमातून महिलांचे संघटन केले.
पती राणाजगजितसिंह यांच्या प्रचारात अर्चना पाटील सक्रिय सहभाग घेत.
अर्चना पाटील यांनी पुण्यातील महाविद्यालयातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेतले आहे.
अर्चना पाटील यांनी पती पाठोपाठ सक्रिय राजकारणात प्रवेश केला.
अर्चना पाटील या धाराशिव जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्षा आहेत.
उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांचे नाव निश्चित झाले तर त्या भाजपमधून राष्ट्रवादीत (अजित पवार गट) प्रवेश करतील.