Chetan Zadpe
मागील वीस वर्षांपासून रखडलेले धारावी झोपडपट्टी पुनर्विकासाचे अदानी समूहाला मिळाले आहे. याच मुद्द्यावरुन आता मुंबईत राजकारण तापले आहे.
अदानी समूहाचे या कामाचे निविदा मंजूर झाले असून एवढ्या मोठ्या अन् विशाल कामाचे पुनर्विकास अदानी समूह करणार आहे.
धारावीचा कायापालट होण्याचा धावा सरकार करत आहे. अदानी इन्फ्रा हे काम करणार आहे. अदानी इन्फ्राने 5069 कोटी रुपयांची बोली लावली होती.
धारावीत किती लोक राहतात? याची अधिकृत आकडेवारी नाही. मात्र येथे 6 ते 10 लाख लोक राहत असल्याचा अंदाज आहे. धारावीत 58 हजार कुटुंबे आणि सुमारे 12 हजार व्यापारी संकुले आहेत.
स्लमडॉग मिलेनियर' हा चित्रपट 2008 मध्ये प्रदर्शित झाला असता. या चित्रपटाचे शूटिंग धारावीत झाले होते.
विकासाच्या नावाखाली सरकार धारावीकरांची फसवणूक करत असून आपण या विरोधात मोर्चा काढणार असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधकांकडून विरोध केले जात असताना धारावीचा चेहरा-मोहरा बदलून कायापालट करणार असल्याचे अदानी समूहांकडून सांगण्यात येत आहे.