Pradeep Pendhare
राज्यातील ऑटो रिक्षा आणि मीटर टॅक्सी चालकांना विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो आहे.
‘धर्मवीर आनंद दिघे महाराष्ट्र ऑटो रिक्षा आणि मीटर्ड टॅक्सी चालक कल्याणकारी मंडळ’ स्थापन केले आहे.
महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी चालकांनी सभासद म्हणून ऑनलाईन नोंदणी करण्याचं आवाहन प्रादेशिक परिवहन विभागानं केलं आहे.
चालकांना जीवनविमा व अपंगत्व विमा योजना, आरोग्यविषयक सुविधा, कर्तव्यावर असताना झालेल्या दुखापतीसाठी 50 हजार रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाते.
पाल्यांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती योजना, तसेच कामगार कौशल्यवृद्धीसाठी विशेष प्रशिक्षण योजनांचा लाभ दिला जातो.
या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक आणि पात्र चालकांनी सर्वप्रथम मंडळाचे सभासदत्व घेणे आवश्यक आहे.
सभासद नोंदणीसाठी अर्ज https://ananddighekalyankarimandal.org या संकेतस्थळावर ऑनलाईन सादर करावा.
नोंदणी करताना वाहनाचा नोंदणी क्रमांक, परवाना, अनुज्ञप्ती, रेशनकार्ड, आधार आणि पॅन क्रमांक, तसेच कुटुंबातील सदस्यांची माहिती गरजेची असणार.
सभासद नोंदणी शुल्क 500 रुपये अन् वार्षिक सभासद शुल्क 300 रुपये अशी एकूण 800 रुपये रक्कम भरवी लागणार आहे.