Jagdish Patil
हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र यांनी वयाच्या 89 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.
धर्मेंद्र यांच्या जाण्यानं चित्रपटसृष्टीत आणि चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.
धर्मेंद्र यांच्या निधनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक दिग्गज नेत्यांनी आणि कलाकारांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
धर्मेंद्र यांनी आपल्या अभिनयाचा ठसा चित्रपटसृष्टीमध्ये उमटवलाच पण त्यांनी राजकारणात देखील आपला करिष्मा दाखवला.
2004 सालच्या 'स्विंग इंडिया' या भारतीय जनता पक्षाच्या मोहिमेमुळे प्रेरित होऊन त्यांनी राजकारणात प्रवेश केला.
या काळात त्यांनी शत्रुघ्न सिन्हा यांच्यासह भाजपचे ज्येष्ठ नेते लाल कृष्ण अडवाणींची भेट घेतली आणि राजकीय प्रवास सुरू केला.
त्यानंतर त्यांनी बिकानेरमधून लोकसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत त्यांनी काँग्रेस उमेदवार रामेश्वर लाल डूडी यांचा 60 हजार मतांनी पराभव केला.
मात्र, त्यांचं मन राजकारणात जास्त काळ रमलं नाही. त्यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात त्यांची संसदेती उपस्थिती खूपच कमी होती.
तर धर्मेंद्र यांचा मुलगा सनी देओल याने एका मुलाखतीत त्यांना राजकारण आवडत नसल्याचं सांगितलं होतं.
दरम्यान, 2009 साली खासदारकीचा कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर धर्मेंद्र यांनी राजकारणातून संन्यास घेतला.