Rashmi Mane
पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी पालवे–गर्जे यांनी 22 नोव्हेंबर रोजी मुंबईत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
शनिवारच्या संध्याकाळी घरात संशयास्पद स्थितीत गौरी यांचा मृतदेह आढळला.
या प्रकरणाची माहिती बाहेर आल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातच नव्हे तर स्थानिक पातळीवरही एकच खळबळ उडाली आहे. घटनेमागील कारणांबाबत अनेक चर्चा रंगू लागल्या आहेत.
यातच सोशल मीडियावर अनंत आणि गौरी यांच्या लग्नसोहळ्याचे फोटो वेगाने व्हायरल होत आहेत.
या वर्षीच फेब्रुवारी महिन्यात त्यांचा विवाह मोठ्या थाटामाटात पार पडला होता. राजकीय वर्तुळातील अनेक मान्यवरांनी या सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
या विवाहात पंकजा मुंडे स्वतः कुटुंबासह हजर होत्या. त्यामुळे हा सोहळा त्यावेळीही चर्चेचा विषय ठरला होता.
ज्या विवाहसोहळ्याने चर्चा रंगवल्या, त्याच घरात आता एका तरुण डॉक्टरने आत्महत्या केल्याची घटना अत्यंत चिंताजनक ठरली आहे.
डॉ. गौरी यांच्या आई-वडिलांनी या मृत्यूला घातपात म्हटले असून अनंत गर्जे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात गंभीर आरोप करत पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे.
सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला असून मृत्यूचे खरे कारण काय, याबाबत अनेक कोडे उलगडणे बाकी आहे. पोस्टमॉर्टम अहवाल आणि तपासातील निष्कर्ष अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.