Rashmi Mane
केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांची मुलगी नैमिषा प्रधान हिने आपले इन्स्टाग्राम अकाउंट डीएक्टिव्हेट केल्याची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगली आहे. वाढत्या ट्रोलिंगमुळे तिने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.
नीट पेपर लीक, स्पर्धा परीक्षांतील कथित गैरव्यवहार आणि विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमुळे शिक्षण मंत्रालयावर दबाव वाढला आहे. याच काळात नैमिषालाही सोशल मीडियावर टीकेचा सामना करावा लागला.
काही सोशल मीडिया वापरकर्त्यांनी नैमिषाचं अकाउंट शोधून तिच्या जुन्या पोस्ट्सवर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. अनेक कमेंट्स आक्रमक स्वरूपाच्या असल्याचं सांगितलं जात आहे.
ट्रोलिंग वाढत असतानाच नैमिषाचं इन्स्टाग्राम अकाउंट सोशल मीडियावर दिसेनासं झालं. त्यामुळे तिने अकाउंट डीएक्टिव्हेट केल्याची चर्चा अधिक तीव्र झाली.
नैमिषा प्रधानने 2023 मध्ये अमेरिकेतील टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या फ्लेचर स्कूलमधून एलएलएम (LLM) पदवी पूर्ण केली. तिचं उच्च शिक्षण परदेशात झालं आहे.
शिक्षण पूर्ण केल्यानंतर नैमिषाने यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) मध्ये सीनियर असोसिएट म्हणून काम सुरू केलं. आंतरराष्ट्रीय धोरण आणि भागीदारी क्षेत्रात ती कार्यरत आहे.
काही युजर्सनी शिक्षणमंत्रींच्या मुलीने उच्च शिक्षणासाठी परदेशाची निवड का केली, असा प्रश्न उपस्थित केला. या मुद्द्यावर सोशल मीडियावर मोठी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, विद्यार्थ्यांच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. मात्र, विरोधक विद्यार्थ्यांचा राजकीय हेतूसाठी वापर करत असल्याचा आरोप करत प्रधान यांनी या टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.