Deepak Kulkarni
केंद्रातील मोदी सरकारमधील शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे सध्या विरोधकांच्या निशाण्यावर असून त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.
कॉक्रोच जनता पार्टी आणि काँग्रेससह विरोधी पक्षांनी मोदी सरकारवर स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमितता आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरत जोरदार आंदोलन उभारलं आहे.
यातच आता केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची कन्या निमिषा प्रधान हिने आपले इंस्टाग्राम अकाउंट बंद केले आहे.
प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली असतानाच सीजेपीच्या आंदोलनादरम्यान निमिषाला सोशल मीडियावर विद्यार्थ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत असल्याचे समोर येत आहे.
आंदोलकांसह विद्यार्थ्यांना सोशल मीडिया वापरकर्त्यांना निमिषा प्रधानचे इंस्टाग्राम अकाउंट सापडले आणि त्यांनी तिच्या जुन्या पोस्टच्या कमेंट सेक्शनमध्ये तीव्र टीका करण्यास सुरुवात केली. त्यामुळे तिने ते बंद केल्याची माहिती आहे.
निमिषा प्रधानने 2023 मध्ये अमेरिकेतील मॅसॅच्युसेट्स येथील टफ्ट्स युनिव्हर्सिटीच्या फ्लेचर स्कूलमधून एलएलएम (LLM) पूर्ण केले.
त्यानंतर तिने यूएस-इंडिया स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरम (USISPF) मध्ये वरिष्ठ सहयोगी म्हणून काम करण्यास सुरुवात केली.
धर्मेंद्र प्रधान देशाचे शिक्षणमंत्री असताना त्यांच्या मुलीने परदेशात उच्च शिक्षण घेण्याचा निर्णय का घेतला, असा प्रश्न सोशल मीडियावर काही लोकांनी उपस्थित केला.
विद्यार्थी आंदोलने आणि परीक्षेसंबंधित मुद्द्यांवरून धर्मेंद्र प्रधान यांच्यावर विरोधी पक्षांकडून वाढता दबाव असतानाच आता हा वाद सार्वजनिक पद किंवा निर्णयांशी कोणताही संबंध नसलेल्या कुटुंबातील सदस्यांपर्यंत पोहोचला आहे.