DHFL Fraud Case : बँकिंग क्षेत्रातला तब्बल 34 हजार कोटींचा घोटाळा!

Deepak Kulkarni

सीबीआयकडून धीरज वाधवनला अटक

डीएचएफएल बँकेचे माजी संचालक धीरज वाधवनला 34 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय अन्वेषण ब्यूरो (सीबीआय) ने मंगळवारी (ता. 14) अटक केली आहे.

'या' प्रकरणी कारवाई

त्यांना डीएचएफएल बँक कर्ज प्रकरणी चौकशी करून अटक केली आहे.

2022 मध्ये आरोपपत्र

या प्रकरणाबाबत सीबीआयने CBI वाधवन यांच्यावर 2022 मध्ये आरोपपत्र दाखल केले होते.

34 हजार कोटी रुपयांची फसवणूक

सीबीआयने 17 बँकांच्या कन्सोर्टियमची 34 हजार कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप केला होता.

जामिनावर होते बाहेर..

आता त्या प्रकरणी जामिनावर असलेल्या धीरज वाधवन यांना अटक केली आहे.

थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस

फेब्रुवारीमध्ये, सेबीने डीएचएफएलचे DHFL माजी संचालक धीरज आणि कपिल वाधवन या बंधुना 22 लाखांची थकबाकी वसूल करण्यासाठी नोटीस पाठवली होती.

हे दिले होते आदेश

त्यांना बँक खाती तसेच शेअर्स आणि म्युच्युअल फंड होल्डिंग्स संलग्न करण्याचे आदेश दिले होते.

आदेशाचं उल्लंघन

मात्र, या वाधवन बंधूंनी त्या आदेशाचे उल्लंघन केले.

दोघेही डीएचएफएलच्या संचालक मंडळावर...

कपिल वाधवन हे DHFL चे अध्यक्ष आणि MD होते. तर धीरज वाधवन कंपनीचे बिगर कार्यकारी संचालक होते. हे दोघेही डीएचएफएलच्या संचालक मंडळावर होते.

NEXT : PM मोदींकडे ना घर ना कार; एकूण तीन कोटींची संपत्ती