Rashmi Mane
सनातन धर्म आणि हिंदुत्वाची प्रखर भूमिका मांडणारे बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या दरबारात भाजपचे मंत्री दररोज हजेरी लावत आहेत.
नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणांनी चर्चेत असणारे बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री महाराजांची चांगलीच चर्चा सुरू आहे.
डाॅ. भागवत कराड संयोजक असलेल्या या रामकथा, प्रवचन आणि दरबारामध्ये रावसाहेब दानवे, अतुल सावे, संदीपान भुमरे, हरिभाऊ बागडे यांच्यासह संजय शिरसाट, प्रदीप जैस्वाल नियमित हजेरी लावत आहेत.
कराड यांच्यासाठी बागेश्वर धामचा दरबार आणि रामकथेचे आयोजन हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनला आहे.
मात्र, धीरेंद्र शास्त्री यांच्या रामकथेचे आयोजन करण्यासाठी गृहनिर्माणमंत्री अतुल सावे हेही इच्छुक होते. दोघांनीही मध्य प्रदेशात जाऊन धीरेंद्र शास्त्री यांची भेट घेऊन तारीख मिळवण्याचा प्रयत्न केला होता.
कराडांनी बाजी मारत, महिनाभरात सगळी तयारी करून कथेचे आयोजन केले.
सनातन धर्म आणि प्रखर हिंदुत्ववादी विचार धीरेंद्र शास्त्री महाराज आपल्या कथेतून मांडत असल्याने याचा फायदा भाजपला लोकसभा निवडणुकीत होणार आहे.