विमानांचा रंग पांढराच का असतो? 'ही' 5 मोठी कारणे जाणून घ्या

सरकारनामा ब्यूरो

काय आहेत कारणे

आकाशात दिसणारी बहुतांश विमाने पांढऱ्या रंगाचीच का असतात? त्यांचा मूळ रंग पांढराच असतो. कंपन्या आपला लोगो किंवा डिझाइन बदलतात, परंतू बेस कलर पांढराच असतो. ही फक्त परंपरा नाही… यामागे आहे मोठं विज्ञान! काय आहेत कारणे तर चला समजून घेऊया.

Airplane paint reasons | Sarkarnama

उष्णतेपासून संरक्षण

पांढरा रंग सूर्यकिरण परावर्तित करतो. विमान तासनतास उन्हात उडत असताना बाहेरील कवच जास्त गरम होत नाही.

Airplane paint reasons | Sarkarnama

तापमान नियंत्रण

विमान थंड राहिल्यामुळे आतील उपकरणे सुरक्षित राहतात. केबिनमधील तापमान नियंत्रित ठेवणेही सोपे होते.

Airplane paint reasons | Sarkarnama

तडे, गळती लगेच दिसते

पांढऱ्या रंगावर क्रॅक, तेलगळती किंवा गंज सहज लक्षात येतो. देखभाल आणि तपासणी अधिक अचूक होते. डेंट किंवा नुकसान स्पष्ट दिसल्यामुळे तांत्रिक टीमला दुरुस्ती करणे सोपे जाते. सुरक्षा वाढते.

Airplane paint reasons | Sarkarnama

बर्ड स्ट्राईक कमी

आकाशात पांढरा रंग उठून दिसतो. पक्षी लांबून विमान पाहू शकतात आणि दिशा बदलतात.

Airplane paint reasons | Sarkarnama

खर्च, वजन, इंधन बचत

जास्त रंग म्हणजे जास्त वजन. पांढरा रंग हलका असल्याने इंधनाचा खर्च कमी होतो. उन्हामुळे पांढरा रंग लवकर फिका पडत नाही. वारंवार पेंट करण्याचा खर्च वाचतो.

Airplane paint reasons | Sarkarnama

पुनर्विक्रीसाठी फायदेशीर

पांढऱ्या रंगाची विमाने विकणे सोपे असते. नवीन मालकाला फक्त लोगो बदलावा लागतो. विमानाचा पांढरा रंग हा केवळ सौंदर्य नाही. तो सुरक्षितता, खर्च आणि कार्यक्षमतेशी थेट जोडलेला आहे.

Airplane paint reasons | Sarkarnama

आयुर्मान वाढते

म्हणूनच जगभरातील विमान कंपन्या पांढऱ्या रंगालाच देतात पहिली पसंती! यामुळे विमानाचे आयुर्मान वाढते आणि प्रवाशांचा प्रवास अधिक सुखकर होतो.

Airplane paint reasons | Sarkarnama

NEXT : Standing Committee : कोण ठरवतो शहराचा अर्थसंकल्प अन् कोट्यवधींचे टेंडर? स्थायी समितीची भूमिका काय...

Municipal Standing Committee | Sarkarnama
येथे क्लिक करा.