Pradeep Pendhare
सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जमावावर निर्बंध घातले जातात. मर्यादा घालून दिलेल्या संख्येपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई असते.
विशिष्ट परिसरात नागरिकांच्या हालचालींवर कडक निर्बंध घातले जातात. घराबाहेर पडणे, रस्त्यावर फिरणे किंवा वाहनाने प्रवास करण्यावर बंदी असते. अत्यावश्यक सेवांना किंवा परवानगी असलेल्या व्यक्तींना सूट दिली जाते.
जमावबंदीचा मुख्य उद्देश लोकांच्या एकत्र येण्यावर निर्बंध, तर संचारबंदीमध्ये नागरिकांच्या हालचालींवरही निर्बंध असतात.
भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम 163 अंतर्गत प्रतिबंधात्मक आदेशाने जमावबंदी लागू होते. संभाव्य दंगल, सार्वजनिक शांततेचा भंग किंवा मानवी सुरक्षिततेला धोका टाळण्यासाठी आदेश दिले जातात.
जमावबंदीत अनेक परिस्थितींमध्ये घराबाहेर पडता येते. परंतु अनेक निर्बंध असतात. जमाव जमवणे, मोर्चा किंवा मिरवणूक काढणे यावर बंदी असते.
वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती, रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा यांना संचारबंदीत सूट असते. दूध, औषधे, अन्नधान्य यांसारख्या सेवांबाबत स्वतंत्र नियम, असतात. स्थानिक प्रशासनाच्या आदेशावर बहुतांशी अवलंबून असते.
लागू आदेशाचे जाणीवपूर्वक उल्लंघन केल्यास भारतीय न्याय संहितेच्या कलम 223 अंतर्गत कारवाई होऊ शकते. उल्लंघनाचे स्वरूप आणि त्यातून निर्माण झालेल्या धोक्यानुसार शिक्षा ठरते.
प्रशासनाचा अधिकृत आदेश, कोणत्या भागात आणि किती वेळ निर्बंध, प्रशासनाकडून सूट दिलेल्या सेवांची माहिती आणि अफवांवर विश्वास ठेवू नका आणि पोलिसांच्या सूचनांचे पालन करण्याच्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.