Top 8 Indian government apps : प्रत्येक भारतीय व्यक्तीच्या फोनमध्ये असायलाच हवे 'हे' 8 बेस्ट सरकारी अ‍ॅप्स

Rashmi Mane

8 सरकारी अ‍ॅप्स

"स्मार्टफोनमध्ये हे 8 सरकारी अ‍ॅप्स हवंच हवे! तुमचं आयुष्य करतील सोपं"

Top 8 Indian government apps | Sarkarnama

UMANG app

UMANG ही भारत सरकारची एक अत्यंत उपयुक्त अ‍ॅप आहे, जी एकाच प्लॅटफॉर्मवर २०० हून अधिक सरकारी सेवा उपलब्ध करून देते.

UMANG app | Sarkarnama

DigiLocker

महत्वाचे कागदपत्र नेहमी जवळ ठेवणे शक्य नसते, पण DigiLocker हे अ‍ॅप आपले डिजिटल डॉक्युमेंट्स जसे की आधार, लायसन्स, मार्कशीट, RC इत्यादी सुरक्षित ठेवते.

DigiLocker | Sarkarnama

BHIM (Bharat Interface for Money)

UPI च्या माध्यमातून पैसे पाठवणे आणि स्वीकारणे हे BHIM अ‍ॅपमुळे अतिशय सोपे झाले आहे. सुरक्षित आणि वेगवान व्यवहारासाठी हे अ‍ॅप वापरणे योग्य आहे.

BHIM (Bharat Interface for Money) | Sarkarnama

mAadhaar

UIDAI द्वारे विकसित केलेले mAadhaar अ‍ॅप आपल्या आधारशी संबंधित सर्व माहिती एकाच ठिकाणी ठेवते. आधार कार्ड डाउनलोड करणे, OTP द्वारे लॉगिन, QR कोड स्कॅनिंग अशी अनेक वैशिष्ट्ये या अ‍ॅपमध्ये आहेत.

mAadhaar | Sarkarnama

GST Rate Finder

टॅक्सबाबत स्पष्टता हवीय? यासाठी हे अ‍ॅप हवंच!
ही अ‍ॅप GST म्हणजे वस्तू व सेवा कर यासंदर्भात माहिती देणारी आहे. कोणत्या वस्तूवर किंवा सेवांवर किती GST लागतो, हे सहज आणि जलदपणे शोधण्यासाठी हे अ‍ॅप उपयुक्त आहे. व्यापारी, उद्योजक आणि सामान्य ग्राहक यांच्यासाठी हे एक उपयुक्त टूल आहे.

GST Rate Finder | Sarkarnama

MyGov (My Government India)

जनतेचा आवाज थेट सरकारपर्यंत!
MyGov अ‍ॅपद्वारे नागरिक थेट सरकारशी संवाद साधू शकतात. योजना, मोहिमा, सल्ले, मतं आणि प्रश्न येथे शेअर करता येतात. सर्वेक्षणात सहभागी होऊन लोकशाही प्रक्रियेत थेट भाग घेता येतो.

MyGov (My Government India) | Sarkarnama

SWAYAM App

शिक्षण सर्वांसाठी!
SWAYAM हे सरकारचे एक ई-लर्निंग प्लॅटफॉर्म आहे. यावर शालेय, महाविद्यालयीन आणि व्यावसायिक अभ्यासक्रम मोफत उपलब्ध आहेत. IIT, IIM, IGNOU यांसारख्या संस्थांच्या दर्जेदार कोर्सेसचा लाभ तुम्ही घरबसल्या घेऊ शकता.

SWAYAM App | Sarkarnama

mParivahan

वाहनाशी संबंधित सर्व सेवा एका क्लिकवर!
ही अ‍ॅप वाहन नोंदणी, परवाना माहिती, प्रदूषण प्रमाणपत्र, ई-चालान इत्यादी माहिती सहज मिळवून देते. वाहनधारक आणि चालकांसाठी ही अ‍ॅप फारच उपयुक्त आहे.

mParivahan | Sarkarnama

Next : उच्चशिक्षित खासदारांचा आकडा वधारला; राज्यातील लोकसभेवर निवडून आलेले 6 डॉक्टर कोण ?

येथे क्लिक करा