Rashmi Mane
केंद्र सरकारने 'डिजिटल ॲग्रीकल्चर मिशन'ची घोषणा केली असून यासाठी 2,817 कोटींचा निधी मंजूर केला आहे.
पायलट प्रोजेक्ट्सच्या यशानंतर आता हा मिशन संपूर्ण भारतात लागू झाला आहे.
हा एक डिजिटल प्लॅटफॉर्म असून यामार्फत शेतकऱ्यांना शेतीसंबंधी सर्व माहिती ऑनलाईन पद्धतीने मिळणार आहे.
डिजिटल ॲग्रीकल्चर मिशनद्वारे शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज, बीजांची गुणवत्ता, कीटकनाशकांचा वापर, बाजारभाव व विक्रीची माहिती सहज रित्या मिळणे सोपे होणार आहे.
शेतकऱ्यांना डिजिटल माध्यमातून सक्षम करणे, उत्पादकता वाढवणे व कृषी खर्च कमी करणे.
आधुनिक शेती, स्मार्ट तंत्रज्ञान आणि नवनवीन प्रयोगांना या मिशनमुळे चालना मिळणार आहे.
मातीची सुपीकता, जल व्यवस्थापन आणि नैसर्गिक साधनसंपत्तीचा शाश्वत वापर हेही या योजनेचे उद्दिष्ट आहे.
डिजिटल ॲग्रीकल्चर मिशनमुळे शेतकरी होणार स्मार्ट, आत्मनिर्भर आणि तंत्रज्ञानसक्षम!