Rashmi Mane
पीएम किसान 20वा हप्ता कधी येणार? जाणून घ्या महत्त्वाचे अपडेट!
शेतकऱ्यांनो, पीएम किसान योजनेचा 20वी हप्ता अजूनही थांबलेला आहे.
जून महिना गेला, जुलै संपत आला पण अजून खात्यात पैसे आले नाहीत.
सगळ्यांना 20वा हप्ता कधी मिळणार हा एकच प्रश्न पडला आहे. तर त्यातच आता अशी माहिती मिळत आहे की पीएम मोदींच्या बनारस दौऱ्यात ते याबाबत घोषणा करू शकतात.
पीएम मोदी 2 ऑगस्टला बनारस दौऱ्यावर असून तिथे मोठा कार्यक्रम होणार आहे. या प्रोग्राममध्ये घोषणा होऊ शकते!
या कार्यक्रमात पीएम मोदी उत्तर प्रदेशाला 1000 कोटींच्या प्रकल्पांची भेट देणार आहेत.
त्याचबरोबर पीएम किसान योजनेचा 20वा हप्ता जाहीर होऊ शकते.
फक्त तेच शेतकरी ज्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. भू-सत्यापन केले आहे अशाच शेतकऱ्यांना मिळणार 20वा हप्ता.
सध्या ही शक्यता वर्तवण्यात येत आहे. सरकारकडून अधिकृत घोषणा झाल्यावरच निश्चित तारीख कळेल.