Jagdish Patil
देशात 'डिजिटल अरेस्ट'च्या नावाखाली लोकांच्या फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. याला आळा घालण्यासाठी गृहमंत्रालयाने मोठी कारवाई केली आहे.
'आयफोरसी'च्या माध्यमातून देशातील सायबर गुन्हेगारांच्या 77 हजारांहून अधिक व्हॉट्सॲप नंबर ब्लॉक केले आहेत.
पोलिस, CBI, किंवा ईडीचे अधिकारी असल्याचं सांगून सायबर गुन्हेगार नागरिकांना 'डिजिटल अरेस्ट' करतात.
फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार व्हॉइस किंवा VIDEO व्हॉट्सॲप कॉलिंग तसंच स्काइपचा वापर करतात.
'आयफोरसी'च्या तपासानंतर सायबर गुन्हेगारांचे 77 हजार 195 व्हॉट्सॲप नंबर आणि 3 हजार 255 स्काइप खाती ब्लॉक करण्यात आली आहेत.
ऑनलाइन फसवणुकीनंतर सायबर गुन्हेगार विविध बँक अकाऊंटमध्ये पैसे पाठवतात. या खात्यांचे पासबुक, एटीएम कार्ड सर्व सायबर गुन्हेगारांकडेच असते.
सायबर गुन्हेगार एकाच वेळी हजारो सिमकार्डचा वापर करतात म्हणून 7 लाखांहून अधिक सिमकार्डही ब्लॉक केली आहेत.
तर IMEI नंबर शोधून 2.08 लाख मोबाइल देखील ब्लॉक करण्यात आले आहेत.