Ratan Tata : रतन टाटा यांचे 15,000 कोटी कोणाला मिळणार? मृत्युपत्रात 'ही' मोठी माहिती समोर

सरकारनामा ब्यूरो

रतन टाटा

9 ऑक्टोबरला टाटा सन्सचे अध्यक्ष रतन टाटा यांचे निधन झाले. मात्र,त्यांच्या आरटीईएफ फाउंडेशनचे उत्तराधिकारी कोण होणार? त्यांची 15000 कोटीची संपत्ती कोणाला मिळणार याविषयी चर्चांना उधाण आलं आहे...

Ratan Tata | Sarkarnama

आरटीईएफ

एंडोमेंट फाउंडेशन (आरटीईएफ) या रतन टाटाच्या कंपनीत गोधळ निर्माण झाल्याने टाटांनी त्यांचे वैयक्तिक पैसे खर्च करून हे फाउंडेशन सुरु ठेवले.

Ratan Tata | Sarkarnama

फाउंडेशनचा ट्रस्टी कोण?

आरटीईएफ या फाउंडेशनमधून समाजसेवेची कामे केली जात होती. परंतु टाटाच्या मृत्युनंतर या फाउंडेशनचा ट्रस्टी कोण असणार आहे याचा उल्लेख त्यांच्या मृत्युपत्रात नसल्याचं समोर आलं आहे.

Ratan Tata | Sarkarnama

ट्रस्टी

यामुळे फाउंडेशनचा ट्रस्टीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त सरन्यायाधीशांच्या मदतीने ट्रस्टी बनवले जाऊ शकतात.

Ratan Tata | Sarkarnama

ट्रस्टी निवडण्याचा अधिकार कोणाला?

टाटांच्या मृत्युपत्राची अंमलबजावणी करणाऱ्या लोकांमध्ये ट्रस्टी निवडण्याचा अधिकार कोणाला आहे, याचा निर्णय टाटा कुटुंब किंवा टाटा ट्रस्टचे सदस्य घेतील.

Ratan Tata | Sarkarnama

किती संपत्ती?

यात रतन टाटा यांची एकूण संपत्ती 15,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. टाटा समूहाच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, टाटा यांना RTEF टाटा ट्रस्टपासून वेगळा ठेवायचा होता. पण टाटा सन्समध्ये टाटा ट्रस्टचा 66% इतका हिस्सा आहे.

Ratan Tata | Sarkarnama

रक्कम कोठे होणार जमा?

टाटा यांना त्यांची संपत्ती समाजसेवेत त्यांना गुंतवायची होती. त्यांच्याकडे अनेक गाड्या आहेत.त्यांचा लिलाव होऊ शकतो. आणि त्यातून मिळणारी रक्कम ही आरटीईएफकडे जमा होण्याची शक्यता आहे.

Ratan Tata | Sarkarnama

अद्याप स्पष्ट झालेले नाही

टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांना व्यवस्थापकीय विश्वस्त करण्याची इच्छा व्यक्त केली होती. मात्र, आरटीईएफच्या विश्वस्तपदी कोण असणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Ratan Tata | Sarkarnama

NEXT : कोण आहेत अमरावती विभागाच्या आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आलेल्या श्वेता सिंघल

येथे क्लिक करा...