सरकारनामा ब्युरो
मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंग हे विठ्ठलभक्त म्हणून परिचित आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते न चुकता पंढरपूरच्या वारीला येतात.
एकदा मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री असताना ते वारीला आले असता त्यांच्या हस्ते शासकीय महापूजा संपन्न झाली होती.
1994 साली शरद पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. पण त्यांचा पंढरपूर दौरा अचानक रद्द झाला.
त्यांच्या गैरहजेरीत मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजयसिंग यांच्या हस्ते पांडुरंगाची महापूजा पार पडली.
आषाढीची शासकीय पूजा अन्य राज्याच्या मुख्यमंत्र्याच्या हस्ते होण्याची ही पहिलीच वेळ होती.
महाराष्ट्र सरकारतर्फे तत्कालिन पाटबंधारे खात्याचे मंत्री पद्मसिंह पाटील उपस्थित होते.
पूजेनंतर सभामंडपात मुख्यमंत्री दिग्विजयसिंग आणि डॉ. पाटील यांचा मंदिर समितीचे अध्यक्ष बाळासाहेब भारदे यांनी सत्कार केला होता.
या पुजेनंतर दिग्विजय सिंह यांनी भूकंपग्रस्त किल्लारीला मध्य प्रदेशतर्फे 22 लाख रुपयांची मदत केली होती.
विठुरायाच्या कपाळावर काळा टिळा का? कारण ऐकून डोळे पाणावतील