Sunil Balasaheb Dhumal
राज्यात मनसे २५० जागा लढेल आणि जिंकेलही असा दावा मनसेच्या दिलीप धोत्रेंनी केला आहे.
दिलीप धोत्रे हे मराठवाड्यातील मनसेचे प्रमुख नेते आहेत.
त्यांच्यावर आता नागपूर जिल्ह्याचे विधानसभा निवडणूक निरीक्षक म्हणून जाबाबदारी देण्यात आलेली आहे.
त्यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर बैठकांचा सपाटाच लावला आहे.
राज्यात राज ठाकरेंना मानणारा मोठा वर्ग आहे. त्यावरच मनसेला यश मिळेल असा विश्वास धोत्रेंना आहे.
शिवसेनेने दोनदा विश्वासघात केला. त्यामुळे आमच्यासाठी टाळीचा विषय संपल्याचेही धोत्रेंनी स्पष्ट केले.
अमोल मिटकरींवरील हल्लाचेही त्यांनी समर्थन केले.