Adhalrao Vs Mohite : शिवाजीराव आढळराव यांना दिलीप मोहितेंचा विरोध का?

Vijaykumar Dudhale

पहिल्या निवडणुकीपासून विरोध

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेत प्रवेश करून लोकसभेची निवडणूक लढवली. त्या निवडणुकीपासून खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी आढळराव यांना विरोध दर्शविला आहे.

Dilip Mohite | Sarkarnama

शिवसेनेच्या सभापतीविरोधात अविश्वास

खेड पंचायत समितीत शिवसेनेचे बहुमत असतानाही पक्षाच्या पंचायत समिती सदस्यांनी तत्कालीन सभापती भगवान पोखरकर यांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल केला होता.

Dilip Mohite | Sarkarnama

शिवसेनेतील बंडाला मोहितेंचा पाठिंबा; आढळरावांचा समज

शिवसेनेच्या पंचायत समिती सदस्यांना आमदार दिलीप मोहिते यांचाच पाठिंबा आहे, असा जाहीर आरोप माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला होता.

Dilip Mohite | Sarkarnama

संजय राऊतांचा हल्लाबोल

शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्या प्रकरणात दिलीप मोहिते यांच्याविरोधात रान उठवले होते. खासदार संजय राऊत यांनी खेडमध्ये येऊन मोहिते यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.

Dilip Mohite | Sarkarnama

खेड पंचायत समितीची इमारत

खेड पंचायत समितीच्या इमारतीवरून शिवाजीराव आढळराव पाटील आणि आमदार दिलीप मोहिते यांच्यात वाद होता

-Shivajirao Adhalrao Patil | Sarkarnama

राष्ट्रवादीच्या तिकिटावर लढण्याची तयारी

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडणूक लढविण्याची तयारी आढळराव यांनी दर्शविली होती.

Shivajirao Adhalrao Patil | Sarkarnama

मोहितेंचा विरोध

शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाला खेडचे आमदार दिलीप मोहिते यांनी कडाडून विरोध दर्शविला होता.

Shivajirao Adhalrao Patil | Sarkarnama

मोहितेंची भूमिका

ज्यांनी मुला तुरुंगात डांबण्यापर्यंत, मला आयुष्यातून उठवण्यापर्यंत भूमिका घेतल्या, प्रयत्न केले, त्यांच्याबरोबर काम करण्यापेक्षा मी राजकारण सोडून घरी बसेन, अशी भूमिका दिलीप मोहिते यांनी आढळराव यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर घेतली होती.

Shivajirao Adhalrao Patil | Sarkarnama

अमित शाहांची भेट घेणारे पवनकल्याण कोण आहेत?

Pawan Kalyan | Sarkarnama
Next : येथे क्लिक करा