Chetan Zadpe
पवन कल्याण हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीतीला दमदार कलाकार आहे. त्यांची फॅन फॉलोइंग खूप मजबूत आहे. पवन कल्याणने तेलुगू चित्रपटांमध्ये आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले आहे.
उत्कृष्ट अभिनेता, निर्माता-दिग्दर्शकासह ते राजकारणातसुद्धा पाऊल ठेवले आहे. त्यांनी आपले बंधू चिरंजीवी यांच्या पक्षासाठी काम केले. त्यांनतर त्यांनी आपला स्वतंत्र जनसेना पक्ष काढला.
पवन कल्याण यांचा जन्म 2 सप्टेंबर 1971 रोजी आंध्र प्रदेशमध्ये झाला.
साऊथ चित्रपटांचा सुपरस्टार चिरंजीवीचा धाकटा भाऊ आहे. पवन कल्याणने 1996 मध्ये 'अक्कड अम्माई लक्कड' या चित्रपटातून चित्रपट प्रवासाला सुरुवात केली. यानंतर त्यांनी अनेक चित्रपटांमध्ये काम केले.
पवन कल्याण यांचे तीन वेळा लग्न झाले आहे. त्यांची पहिली पत्नी नंदिनी होती, जिच्याशी त्यांनी 1997 मध्ये लग्न केले, परंतु हे लग्न फार काळ टिकू शकले नाही. 2008 मध्ये दोघेही वेगळे झाले. यानंतर पवन कल्याणने 2009 मध्ये रेणू देसाईसोबत लग्न केले. हे ही लग्न एकूण तीन वर्षे टिकले आणि 2012 मध्ये घटस्फोट झाला. यानंतर पवन कल्याणने 2013 मध्ये ॲना लेझनेवासोबत लग्न केले.
पवन कल्याणला अभिनय करत 26 वर्षांहून अधिक काळ लोटला आहे. या काळात त्यांनी मुख्य अभिनेता म्हणून 25 हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले आहे. पवन कल्याण हा चित्रपटांव्यतिरिक्त अनेक टीव्ही जाहिरातींचा चेहरा आहे.
पवन कल्याण 2008 पासून राजकारणात सक्रिय आहेत. त्यांनी त्यांचे बंधू चिरंजीवीच्या प्रजा राज्यम पक्षासाठी दीर्घकाळ काम केले.
यानंतर पवन कल्याण यांनी स्वतःचा पक्ष काढला. पवन कल्याण यांच्या राजकीय पक्षाचे नाव जनसेना पक्ष आहे. 2014 मध्ये त्यांनी हा पक्ष स्थापन केला आणि अजूनही सक्रिय आहे.
पवनकल्याण आगामी लोकसभेसाठी एनडीएसोबत जाण्याची शक्यता आहे. आज त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांची भेट घेतली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.