Aslam Shanedivan
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत कोल्हापूर जिल्ह्यातील बिरदेव डोणेसह आदिती चौगुले, हेमराज पनोरेकर आणि दिलीपकुमार देसाई यांनी यश मिळवले आहे.
बिरदेव डोणे यांनी 551 वी, आदिती चौगुले यांनी 63 वी हेमराज पनोरेकर यांनी 922 वी रँक मिळवलीय
गडहिंग्लज तालुक्यातील जांभूळवाडी येथील माजी सैनिक कृष्णा देसाई यांचा मुलगा दिलीपकुमार देसाई यांनी शेवटच्या संधीचे सोनं करत आयआरएस पदावर भरारी घेतली आहे
त्यांना कोरोना, डेंग्यू झाला, तीन मुलाखतीत नापास झाले तरिही ते डगमगले नाहीत. उपजिल्हाधिकारी असणाऱ्या बहीण स्वाती यांच्या प्रोत्साहनामुळे ते युपीएससीकडे वळाले
पुण्यात बहिणीकडे राहून सेल्फ स्टडीकरून तयारी केली. त्यानंतर दिल्ली गाठली. त्यावेळी शिवणकाम करणारी बहीण भारती आणि सुरक्षारक्षकाचे काम करणारे दाजी यांनी त्याला दीड लाखांची मदत केली
यातून दिल्लीत क्लॉस लावले मात्र खर्च परवडत नसल्याने त्यांनी पुण्यात परतण्याचा निर्णय घेतला. दरम्यान त्यांची बहीण स्वाती यांची उपजिल्हाधिकारीपदी नियुक्ती झाली.
त्यांनीच पुढचा खर्च उचलला आणि आज दिलीपकुमार यांचे उच्चाधिकारीचे स्वप्न सत्यात उतरले आहे
या काळात घराकडे बहीण सपना आणि तिचे पती संजय पाटील यांनी लक्ष दिल्याने दिलीपकुमार यांनी यशाला गवसणी घालण्याची संधी मिळाली